शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून कार्यकर्ते निर्दोष

मालेगाव :  गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली सन 2015 मध्ये दाखल गुन्ह्याप्रकरणी 150 संशयित शिवसैनिकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अप्पर जिल्हा न्या. अनिरुद्ध गांधी यांनी हा निकाल दिला.

27 सप्टेंबर 2015 रोजी शिवसेनेचे नगरसेवक तानाजी देशमुख यांच्यासह सुमारे दीडशे शिवसैनिकांनी रितसर परवानगीसह श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत पंधरा गणपती मंडळ कार्यकर्ते व गणेशभक्तांचा सहभाग होता.

मिरवणूकीदरम्यान नवीन बसस्थानकानजीक अप्सरा हॉटेलजवळ कोणतेही प्रार्थनास्थळ नसताना विसर्जन मिरवणुकीचे वाद्य वाजवणे पोलिसांनी थांबवले होते. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक नारायण देशमुख, शिवसैनिक व गणेशभक्तांनी जुना आग्रारोड येथे ठिय्या आंदोलन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली देशमुख यांच्यासह आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.


jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here