चाकू हल्ल्यातील तरुणास अटक – एक गंभीर जखमी

जळगाव : देशी दारुचे बिल भरण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेत तरुण जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर तरुणास अटक करण्यात आली आहे.

सुप्रीम कॉलनी भागात राहणारे अक्षय शांताराम दांडगे आणि प्रभाकर उर्फ भुषण भागवत चांदेलकर हे दोघे मद्यपी मित्र दुपारी दारु पिण्यासाठी सोबत गेले. काही वेळाने ते दोघे मोठमोठ्याने वाद घालत दुकानातून बाहेर आले. प्रभाकर चांदेलकर हा अक्षय दांडगे यास दारुचे बिल भरण्यास सांगत होता. आपल्याकडे पैसे नाही असे अक्षय त्याला ओरडून सांगत होता. मात्र प्रभाकर ऐकण्याच्या तयारीत नव्हता.

काही कळण्याच्या आत प्रभाकरने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने अक्षयच्या पोटावर, छातीवर व पायावर सपासप वार केले. या चाकू हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला. तू दारुचे बिल भरले नाही, तुला आता मारुन टाकतो असे म्हणत प्रभाकरने अक्षय यास मोठ्या प्रमाणात जखमी केले. कुणी मध्ये आल्यास तुम्हाला देखील चाकूने वार करेन असे म्हणत प्रभाकर याने घटनास्थळावरुन पलायन केले. बेशुद्ध आणि जखमी अक्षय यास त्याचे काका गणेश दांडगे आणि इतरांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्लेखोर प्रभाकर सुप्रीम कॉलनी परिसरातील जंगलात लपून बसल्याबाबत माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली. पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील, रामकृष्ण पाटील, सतीश गर्जे आदींनी त्याला जंगलातून ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे आणि दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here