पोलिसाला धक्काबुक्की करणा-यास कारावास

नाशिक : वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम.ए.शिंदे यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राजेंद्र बळीराम सोनवणे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

5 जानेवारी 20119 रोजी २०१९ पाथर्डी फाटा येथे आरोपी राजेंद्र सोनवणे, सुनील धनू जाधव हे कारने (एमएच 15 डीसी 5183) पाथर्डी गावाहून अंबडच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांनी एक अपघात केला. त्यावेळी कर्त्यव्यावर हजर असलेले पोलिस कर्मचारी सचिन जाधव यांनी त्यांना कार पोलिस चौकीच्या आवारात लावण्यास सांगितली. त्यावेळी सचिन जाधव यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याने अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. डी. म्हात्रे यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे संकलीत करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.  न्यायालयाने पंच, साक्षीदार, फिर्यादीची साक्ष तसेच तपास अधिका-याने दिलेले पुरावे लक्षात घेत आरोपीस सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. आर. वाय. सुर्यवंशी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here