चोरीची कार पळवून नेतांना अपघात

औरंगाबाद : मुलाच्या वाढदिवसाला ऐनवेळी सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी वडीलांनी विकत आणलेली सेकंड हॅंड कार चोरट्याने लांबवली. मात्र रस्त्यात तिचा अपघात झाला व ती पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. तसेच चोरट्याकडून चोरीच्या दोन मोटार सायकली देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.    

किलेअर्क परिसरातील रहिवासी असलेले विजय कचरु कांबळे यांच्या मुलाचा 15 मे रोजी वाढदिवस असतो. त्याला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी विजय कांबळे यांनी एक सेकंड हॅंड कार घेतली. ती कार त्यांनी अगोदर वाशिंग केली. त्यानंतर ती घराजवळ असलेल्या बुद्ध विहारानजीक उभी केली. 14 मे रोजी त्यांना ती कार जागेवर आढळून आली नाही. सीसीटीव्ही फुटेजमधे दोन जण रात्रीच्या वेळी कारची रेकी आणि चोरी करतांना त्यांना दिसून आले.

सीटी चौक पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली. तपासात सुरुवातीला ऋतिक म्हस्के याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान अट्टल वाहनचोर नीरज बनकर ऊर्फ लड्डया चोरीची कार घेऊन पैठणकडे जात होता. त्यावेळी नक्षत्रवाडी येथील धुळे-सोलापूर महामार्गाच्या पुलाखाली त्याने एका दुचाकीला धडक दिली. नागरिकांनी भरपाईसाठी लड्ड्याला पकडून ठेवले होते. सिटी चौक पोलिस स्टेशनचे कर्मचारी देशराज मोरे आणि शेख गफ्फार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कारसह लड्ड्याला ताब्यात घेतले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here