शिर विरहीत मृतदेह आढळल्याने खळबळ

औरंगाबाद : गंगापूर शहरानजीक सुमारे पाच किमी अंतरावर मांजरी शिवारातील एका विहिरीत पुरुषाचा शीरविरहीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात एका विहिरीत साधारण 55 वर्ष वयाच्या पुरुषाचा शीर नसलेला मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिस पाटील यांनी गंगापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकरी प्रकाश बेले, गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे हे पोलिस ताफ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीच्या पाण्यात तरंगणाऱ्या मृतदेहास बाहेर काढून गंगापूर उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनकामी रवाना करण्यात आला. मयताचे शीर कोठे आहे, घातपात कसा झाला यादृष्टीने तपास केला असता दोन दिवसांपूर्वी लक्ष्मण रायभान नाबदे (55) रा. बोलेगाव, ह.मु. गंगापूर ही व्यक्ती हरवल्याबाबत तक्रार त्यांचा मुलगा रावसाहेब नाबदे यांनी मंगळवारी सकाळीच दिली होती. त्यामुळे शीर सापडल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होईल. पोलिसांनी रात्री एका संशयितास ताब्यात घेतले असून शीर शोधण्याची मोहीम सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here