मालेगाव येथील महिला अत्याचाराचा तपास सुरु

मालेगाव : काही दिवसांपूर्वी इस्लामपुरा परीसरातील एका विवाहित महिलेवर अत्याचार झाला हाेता. या अत्याचार प्रकरणी संबंधित नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पीडित महिलेचे अश्लील फाेटाे व व्हिडिओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. शहर पाेलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास अहवाल मागवण्यात आला असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. इतर चाैघेजण फरार असून पोलिस त्यांचा मागावर आहेत.

बालेशेठ कंपाउंडमधील संशयित अजमल हुसैन इकबाल अहमद ऊर्फ अजमल हाॅटेल याने पीडित महिलेचे काही आक्षेपार्ह फाेटाे तसेच व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल केले हाेते. महिलेच्या तक्रारीनंतर अजमल यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास वीस मे पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here