डॉक्टर महिलेने रुग्णाच्या पतीला पाठवले अश्लील मेसेज

औरंगाबाद : रुग्णालयातील महिला रुग्णासोबत आपल्या पतीचे संबंध असल्याच्या संशयातून महिला डॉक्टरने रुग्णाच्या पतीला अश्लील मेसेज पाठवल्यचे उघड झाले आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नावाने महिला डॉक्टरने सिमकार्ड खरेदी केले. अश्लिल मेसेज पाहून भयग्रस्त रुग्ण महिला व तिच्या पतीने थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांपर्यंत प्रकरण गेल्यानंतर महिला डॉक्टरने मोबाइल बंद करत सिमकार्ड टॉयलेटमध्ये फ्लश करुन नष्ट केले.

दरम्यान उस्मानपुरा पोलिस पथक महिला डॉक्टरपर्यंत गेले. दवाखान्यातील कर्मचारी परशुराम वाहुळे याला अटक करण्यात आली असून महिला डॉक्टरला नोटीस देण्यात आली आहे. या घटनेतील महिला तक्रारदार नगर जिल्ह्यातील रहिवासी असून ती सध्या पतीसह उस्मानपुरा परिसरात राहण्यास आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी तिच्या पतीच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून अश्लील मेसेज आले होते. पोलिस निरीक्षक गीता बागवडे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here