इंग्लंडच्या महिलेचे दागिने चोरी झाले अजमेरला, सापडले अमरावतीत

jain-advt

अमरावती : इंग्लंडच्या महिलेचे दागिने 9 मे रोजी अजमेर दर्गा येथून झाले होते. दिल्ली येथील मोईन कुरेशी या व्यापारी पतीसह सदर महिला सुमारे विस लाख रुपयांचे हिरेजडीत दागिने घेऊन अजमेर येथील प्रसिद्ध दर्ग्यावर दर्शनाला आली होती. दरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ते दागिने चोरी केले होते. या चोरी प्रकरणी अजमेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

९ मे रोजी चोरीचा प्रकार उघड झाल्यातर अजमेर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात एक महिला दागिने चोरताना दिसून आली. त्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत अजमेर पोलिसांनी चोरीच्या कालावधीतील अजमेर येथील लॉजमध्ये कोण कोण कुठून कुठून आले होते याची माहिती संकलीत केली. सीसीटीव्हीत दिसणारी एका लॉजमधे थांबलेल्या संशयीत महिलेचा पत्ता पोलिसांनी मिळवला. त्या पत्याच्या आधारे अजमेर पोलिसांनी अमरावती गाठले. अमरावती हबीबनगर क्रमांक 2 येथे सदर महिला रहात होती. अजमेर एसपींनी कॉल करुन अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना मदत मागितली. त्यानुसार गाडगेनगर पोलिसांच्या मदतीने महिलेस दागिन्यांसह अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here