नातवाच्या त्रासाला वैतागून आजोबांनी केली त्याची हत्या

jain-advt

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी या गावी सतरा वर्षाच्या नातवाची त्याच्या आजी आजोबा व एका महिलेने मिळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. नातवाच्या त्रासाला वैतागून त्याची गळा दाबून हत्या केल्याचे कारण समोर आले आहे. मयुर राजेश लोहे (17) असे हत्या झालेल्या नातवाचे तर गणपतराव उपासराव कंठाळे(60) असे पोलिसांनी अटक केलेल्या आजोबांचे नाव आहे. या घटनेप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

गणपतराव कंठाळे हे मयत मयूरच्या आईचे वडील आहेत. मयूरच्या आई – वडीलांचा वाद असल्याने लहानपणापासून तो आजी व आजोबांकडेच रहात होता. काही वर्षांनी मयुरच्या आईने दुसरे लग्न केले. आर्थिक कारणातून मयुरच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून सोमवारी मध्यरात्री आजी, आजोबा व एका नातेवाईक महिलेने मिळून त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घराजवळच असलेल्या शाळेजवळ आणून टाकला. या घटनेची माहिती समजल्यानंतर शिरखेड पोलिस स्टेशनचे पो.नि. हेमंत कडूकार व त्यांच्या पथकाने पुढील कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here