नर्सची छेड काढणारा फिजिओथेरपिस्ट अटकेत

अमरावती : अमरावती  येथील राजापेठ परिसरातील एका दवाखान्यात काम करणा-या फिजिओथेरपिस्टने दोन दिवसांपूर्वी रुजू झालेल्या शिकाऊ परिचारिकेची छेडखानी केल्याप्रकरणी राजापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष त्र्यंबकराव चौधरी (38), रा. विश्राम नगर, साईनगर, अमरावती असे सदर फिजीओथेरपीस्टचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मंगळवारी 23 मे रोजी आशिष चौधरीने तुला फिजिओथेरपी शिकवतो असे म्हणत या तरुणीला शिकवण्यास सुरुवात केली. मात्र फिजिओथेरपी शिकवण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीसोबत असभ्य वर्तन सुरु केले. तरुणीने राजापेठ पोलिस स्टेशन गाठत आशिष चौधरी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील कारवाई केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here