आगग्रस्त परिवाराला अनिल सोनवणे यांच्या माध्यमातून मदत

anil sonavane jalgaon

जळगाव : रामेश्वर कॉलनी परिसरात काही दिवसांपुर्वी लागलेल्या आगीत भाडेकरी गोसावी परिवाराचा संसार जळून खाक झाला आहे. आगीने उघड्यावर पडलेल्या या परिवाराला वार्डाच्या माजी नगरसेविका लीलाताई सोनवणे यांच्या माध्यमातून अनिलभाऊ सोनवणे यांनी जनतेला आवाहन केले. अनिलभाऊ सोनवणे यांच्या आवाहनाला विविध भागातील रहिवाशांनी प्रतिसाद देत रुपये 5100 ची मदत संकलीत केली. यापुढेही नागरिकांनी शक्य झाल्यास मदत करण्याचे आवाहन अनिलभाऊ सोनवणे यांनी केले आहे.

सौ. अनुताई कोळी यांच्यासह अशपाक भाई, शकील भाई सय्यद, हाजी आबिद भाई, जब्बार भाई शेख, आसिफ भाई खान, जब्बार भाई पटेल, संजयदादा शर्मा आदी विविध भागातील रहिवाशांच्या माध्यमातून संकलीत झालेली रुपये 5100 ची मदत आगग्रस्त गोसावी परिवाराला अनिलभाऊ सोनवणे आणि अनुताई कोळी यांच्या हस्ते देण्यात आली. जोपर्यंत आगग्रस्त गोसावी परिवार स्वबळावर उभा रहात नाही तोपर्यंत माजी नगरसेविका लीलाताई सोनवणे, सौ. अनुताई कोळी, अनिलभाऊ सोनवणे आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे सांगून अनिलभाऊ सोनवणे यांनी गोसावी परिवाराला दिलासा दिला आहे. केवळ फोन करुन आम्हाला कळवा आपल्यास हवे तेव्हा जेवणासह इतर आवश्यक त्या सुविधा घरपोच दिल्या जातील असे गोसावी परिवाराला सांगून अनिलभाऊ सोनवणे यांनी सर्व दानशुर व्यक्तींचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here