आगग्रस्त परिवारास अनिलभाऊ सोनवणे यांची मदत

जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा अजमेरी गल्लीतील परिवाराचे संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले. या परिसरात राहणारे शाहरुखभाई यांनी या घटनेची माहिती अनिलभाऊ सोनवणे यांना दिली. माहिती मिळताच अनिलभाऊ सोनवणे यांनी उघड्या पडलेल्या या परिवाराला मदतीचा हात दिला. माजी नगरसेविका लीलाताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सौ.अनुताई कोळी तसेच अनिलभाऊ सोनवणे यांनी या संकटग्रस्त परिवाराला रोख एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली. याशिवाय अशपाकभाई यांच्या सहकार्याने 100 किलो धान्य देखील पुरवण्यात आले.

हलाखीची परिस्थिती असलेल्या परिवाराला योग्य वेळी मदत मिळाली असून या परिवाराने माजी नगरसेविका लीलाताई सोनवणे, अनुताई कोळी, अनिलभाऊ सोनवणे, अशपाकभाई यांचे आभार मानले आहे. याशिवाय दात्यांनी या परिवाराला मदत देण्याचे आवाहन अनिलभाऊ सोनवणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here