विवाहितेच्या विद्यमान कथित पतीची पुर्वाश्रमीच्या पतीला मारहाण

जळगाव : पती पत्नीचे नाते वकीलाच्या मदतीने फारकत घेतल्यानंतर संपुष्टात आले. त्यानंतर ती विवाहीता त्याच गावातील दुस-या तरुणासोबत राहण्यास गेली. गेल्या चार महिन्यापासून ती विवाहीता दुस-या तरुणासोबत राहू लागली. दरम्यान त्या विवाहीतेचा पहिला पती मोटार सायकलने जळगावला येत असतांना त्याची वाट तिच्या दुस-या कथित पतीने अडवली. तुझ्या पहिल्या पत्नीसोबत माझे चांगले सुरु आहे. आता तु आमचे संबंध का बिघडवतो असे म्हणत दुस-याने पहिल्याला मारहाण सुरु केली.

तुझ्यासोबत राहणा-या माझ्या पत्नीचा आता काहीही संबंध राहिलेला नाही असे समजावत असतांना दुस-या कथित पतीने हातातील लोखंडी आसारीने महिलेच्या पहिल्या पतीच्या डोक्यावर मारहाण करुन दुखापत केली. त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी देखील लोखंडी पाईपाने त्याला मारहाण केली. दरम्यान रस्त्याने जाणा-या काही लोकांनी जखमीला सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार आटोपल्यानंतर जखमीने त्याच्या पुर्वाश्रमी पत्नीच्या विद्यमान कथित पतीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here