बिअर शॉपी फोडणा-यास पोलिस कोठडी

जळगाव : जळगाव तालुक्यातील चिंचोली या गावी बियर शॉपी फोडणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण रा. सुप्रिम कॉलनी जळगाव यास अटक करण्यात आली आहे.

चिंचोली येथील सागर बियर शॉपी फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील निष्पन्न झालेला रेकॉर्डवरील आरोपी दिनकर उर्फ पिण्या यास पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, चेतन सोनवणे, नाना तायडे, सचिन पाटील आदींनी रात्री शिताफीने अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने गुन्हा कबुल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अनिस शेख व त्यांचे सहकारी रतीलाल पाटील करत आहेत. अटकेतील आरोपी पिण्या याच्याविरुद्ध चोरीचे सतरा गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here