बाथरुममधील महिलेकडे वाईट नजरेने बघणा-याविरुद्ध गुन्हा

जळगाव : बाथरुम मधे अंघोळीसाठी गेल्यानंतर तिला बाथरुमच्या जाळीतून वाईट नजरेने बघणा-याविरुद्ध जळगाव शहर पोलिस सटेशनला विनयभंगाचा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीस वर्ष वयाची सदर महिला बळीराम पेठ भागातील रहिवासी असून खासगी नोकरी करते. तिच्या घरासमोर राहणारा 62 वर्ष वयाचा इसम गेल्या सात ते आठ वर्षापासून ती बाथरुममधे गेल्यानंतर बाथरुमच्या जाळीतून तिला वाईट उद्देशाने बघत असल्याचा महिलेचा आरोप आहे. तसेच ज्यावेळी सदर महिला घरात असते तेव्हा देखील तो इसम तिच्याकडे वाईट नजरेने बघतो असा देखील महिलेचा आरोप आहे. त्याला समजावण्यास महिला गेली असता तिच्या तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची त्याने धमकी देत लज्जास्पद वर्तन केल्याच्या आरोपाखाली महिलेने जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत. आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here