जळगाव शहरात तरुणाची हत्या

जळगाव : आज सकाळी शहरातील कासमवाडी परिसरातील मोकळ्या जागी एका तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले. तपासाअंती हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सागर वासुदेव पाटील असल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत सागर पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे देखील समजते.

ईश्वर कॉलनी परिसरात राहणारा सागर वासुदेव पाटील हा मध्यरात्री कुणाच्या तरी निरोपावरुन घरातून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. सागर यास मद्यपानाची सवय होती. आज भल्या पहाटे त्याची दगडाने मारहाण करत हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. दरम्यान घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने कायदेशीर कारवाई करत मृतदेह सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनकामी रवाना केला आहे. अधिक तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here