लाचखोर पीएसआयला दोन दिवस पोलिस कोठडी

jain-advt

जळगाव : तक्रारदाराकडून सुरुवातीला साडेचार लाख रुपयांच्या मागणीनंतर घासाघीस करुन एक लाख रुपयांची लाच घेणा-या मेहुणबारे पोलिस स्टेशन (ता. चाळीसगाव जि.जळगाव) येथील लाचखोर पोलिस उप निरीक्षकास दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्या. डी.एन. खडसे यांनी लाचखोर पीएसआय योगेश जगन्नाथ ढिकले याची दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

या घटनेतील तक्रारदाराविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनला 29 मार्च 2022 रोजी गु.र.नं. 71/2022 भादवि कलम 115, 118 व 120 ब नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्या गुन्ह्याच्या कागदपत्रात योग्य ती मदत करुन न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यासह पोलिस स्टेशनला दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात पीएसआय योगेश ढिकले यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला पंचासमक्ष साडेचार लाख रुपयांची मागणी केली. नंतर घासाघीस अर्थात तडजोड करुन ती रक्कम एक लाख रुपये देण्याघेण्याचे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here