तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना अमळनेर येथून अटक

jain-advt

जळगाव : आज भल्या पहाटे जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात सागर वासुदेव पाटील या तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली. या खूनाचा उलगडा झाला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरिफ अयुब शहा व जुबेर शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. त्यांना अमळनेर येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, गोविंदा पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील असे घटनास्थळी दाखल झाले होते. मयत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून तो खूनातील आरोपी आहे.

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. कुमार चिंता देखील घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा माग काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या माहितीच्या आधारे अमळनेर येथे रवाना झाले. सदर गुन्हा आरिफ अयुब शहा व जुबेर शेख या दोघांनी केला असल्याचे उघडकीस आले आहे. दोघांना एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने अमळनेर येथून ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here