मोबाईल चोरट्यास मुद्देमालासह अटक

जळगाव : मोबाईलवर बोलत रस्त्याने चालणा-या मोबाईलधारकाच्या हातातून तो हिसकावून पलायन करणा-या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने शोध घेत काही तासातच अटक केली. हातातून गेलेला मोबाईल काही तासात पुन्हा हाती आल्याने तक्रारदार मोबाईलधारकास हायसे वाटले. रुपेश सुधाकर पाटील रा. जामनेर जिल्हा जळगाव असे सदर मोबाईलधारकाचे नाव आहे. रविवारी दुपारी तिन वाजेच्या सुमारास रुपेश जिल्हा क्रिडा सुंकुल परिसरात मोबाईलवर बोलत पायी चालत होता. तेवढ्यात मोटार सायकलवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावला. त्यानंतर दोघांनी तेथून स्कुटीने पलायन केले.

या घटनेच्या तपासकामी पोलिस उप निरीक्षक देशमुख व गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी लागलीच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्हा दाखल होत असतांनाच तांत्रीक विश्लेशनाच्या आधारे तपास देखील सुरु होता. स्कूटीवर मागे बसून मोबाईल हिसकावणारा तरुण जबरी चोरीच्या गुन्ह्यातील नकुल शंकर इंगळे हा असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे नकुल इंगळे यास गेंदालाल मिल परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. स्कुटी चालक रितेश पवार रा. गेंदालाल मिल हा फरार होण्यात यशस्वी झाला. ताब्यातील नकुल इंगळे याच्याकडून त्याने चोरी केलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला.

पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील हे.कॉ. महेंद्र पाटील, गणेश पाटील, तुषार जवरे, पोलिस नाईक संतोष सोनवणे, जुबेर तडवी, योगेश साबळे, पो.कॉ. अमित मराठे, समाधान पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी सुधीर साळवे, हेमंत न्हायदे, जळगाव शहर पो स्टेचे कर्मचारी तेजस मराठे आदींनी या गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here