सुशांतच्या कथित आत्महत्येचा तपास सीबीआयकडे

Sushant Singh Rajput

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येचा तपास अखेर सीबीआयकडे वर्ग झाला आहे. बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली आहे. यापुढे या प्रकरणी पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला कथन केले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने वकील अ‍ॅड. तुषार मेहता यांनी बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. आता हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. रियाचे वकील श्याम दिवान यांनी म्हटले की अ‍ॅड. तुषार मेह्ता यांनी जे काही सांगितले तो या सुनावणीचा विषय नाही. रियाने या सर्व चौकशी प्रकरणी स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. बिहारमध्ये नोंदवलेला एफआयआर हा कायद्यानुसार नसल्यामुळे न्यायालयाने हे रोखावे, अशी मागणी दिवान यांनी केली आहे.

बिहार पोलीस मुंबईला आले व स्वत: चौकशी करायला लागले. हा प्रकार त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे दिवान यांनी म्हटले आहे. मुंबई पोलीस अगोदरपासून चौकशी करत आहेत. रियाविरोधात पाटण्यामध्ये दाखल झालेला गुन्हा मुंबईला वर्ग करावा. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांचे जबाब नोंदवले असल्याचे अ‍ॅड. दिवान यांनी म्हटले आहे.

न्यायमूर्ती ऋषिकेश राय यांनी म्हटले की जेव्हा एखाद्या हाय प्रोफाईल विशेषत: बॉलिवूडच्या कलाकाराचा मृत्यू होतो तेव्हा प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो. सीबीआय चौकशीबाबत महाराष्ट्र शासनाने उत्तर द्यावे. त्यावर आम्ही ठरवू की या प्रकरणी कोण तपास करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here