बुलडाणाच्या माजी आमदारास दिल्ली पोलिसांनी केले स्थानबद्ध

jain-advt

बुलडाणा : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली. त्यामुळे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे निदर्शने केली. यावेळी निदर्शने करणा-या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. बुलडाण्याचे माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांना देखील अटकेनंतर मंदिर मार्ग पोलिस स्टेशनला स्थानबद्ध करण्यात आले.

हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांना समर्थन देण्यासाठी दिल्ली येथे गेले होते. त्याठिकाणी सुरु असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कन्हैय्याकुमार यांच्या सोबत असलेले हर्षवर्धन सपकाळ यांनाही स्थानबद्ध करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here