राजेंद्र बंबविरुद्ध सहाव्या गुन्ह्याची नोंद

धुळे : अवैध सावकारीमुळे अटकेतील राजेंद्र बंब याच्याविरुद्ध देवपूर पोलिस स्टेशनला सहाव्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कर्जदारांच्या नावे केलेल्या बनावट एफडी एका कर्जदाराच्या नावे लॉकरमध्ये ठेवल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.

देवपुर परिसरातील रहिवाशी राजेंद्र मधुकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2016 मधे त्यांनी राजेंद्र जीवनलाल बंब याच्याकडून कर्ज घेतले होते. प्लॉटची कागदपत्रे बंब याने ठेवून घेतली होती. तक्रारदार राजेंद्र पाटील यांनी वर्षभरात व्याजासह घेतलेल्या कर्जाची परतफेड देखील केली होती. त्यानंतर पुन्हा पैशांची गरज भासल्याने राजेंद्र पाटील यांनी राजेंद्र बंब याचेकडून नवीन कर्ज घेतले. यावेळी बंब याने पाटील याच्या शिंगावे शिवारात असलेल्या त्यांच्या बखळ प्लॉटची कागदपत्रे बंब याने ठेवून घेतली होती.

या कागदपत्रांचा आधार घेत बंब याने योगेश्वर नागरी सहकारी पतपेढीत लॉकर उघडले. त्यावर बनावट सह्या करुन स्वत:साठी लॉकरचा उपयोग केला. विलास ताकटे यांनी देखील काही दिवसांपुर्वी धुळे शहर पोलिस स्टेशनला एक तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याप्रकरणी बंब याचा अटकपूर्व जामिन न्यायालयाने फेटाळला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here