घरगुती गॅस महागला, व्यावसायीक झाला स्वस्त

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत आजपासून वाढली आहे. गॅस महाग झाल्यामुळे गृहींणींचे बजेट विस्कळीत झाले आहे. जळगाव शहरात घरगुती गॅस (भारत गॅस) ची किंमत आज 6 जुलै रोजी 1058.50 पैसे एवढी झाली असून त्यात पन्नास रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायीक गॅस (भारत गॅस) आठ रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत आज 2054 रुपये एवढी झाली आहे.

मुंबई शहरात घरगुती सिलेंडर आता 1052.50 या रकमेत उपलब्ध होईल. तर कोलकात्यामध्ये हाच दर 1079 रुपये एवढा झाला आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडर 1068.50 रुपये असल्याचे इंडियन ऑइल कॉर्परेशनने म्हटले आहे. दिल्लीत गेल्या एका वर्षात घरगुती गॅस सिलेंडरचा दर 834.50 रुपयांवरुन 1053 रुपयांपर्यत जावून पोहोचला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here