किराणा दुकान फोडणा-या तिघांना अटक

जळगाव : किराणा दुकान फोडणा-या तिघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारे शंकर विश्वनाथ साबणे, गौरव जगन सांळुखे व महेश संतोष लिंगायत अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील शिवाजी नगर भागात आनंद नागला यांचे मदनलाल पांडुरंग नागला या नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकवून त्यातील 90 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न.210/22 भा.द.वि. 380, 457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती.

पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार शंकर साबणे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोहेकॉ जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे आदींचे पथक तयार केले. या पथकाने शोध घेत शंकर विश्वनाथ साबणे यास ताब्यात घेत अटक केली. त्याने सदर गुन्हा कबुल केला. अधिक चौकशीत त्याने गौरव जगन सांळुखे व महेश संतोष लिंगायत यांचा देखील सहभाग असल्याचे कबुल केले.

अधिक तपासात दोघांना देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. या गुन्ह्यात अजून दोन साथीदार गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे अटकेतील तिघांनी कबुल केले आहे. इतर दोघा फरार आरोपींचा शोध सुरु असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत. अटकेतील तिघे व फरार दोघे आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध पोलिस स्टेशनला मोबाईल चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासकामी अटकेतील तिघांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here