बिस्किटाने भरलेला चोरीचा ट्रक पकडला जळगावला

जळगाव : सहा लाख रुपये किमतीच्या बिस्किटांनी भरलेला 14 लाख रुपयांचा ट्रक औरंगाबादच्या ट्रक चालकाने जळगाव शहरातील भंगार बाजारात परस्पर विक्री केल्याचे उघड झाले आहे. मात्र चिकलठाणा पोलिसांचे पथक जळगावला धडकले आणि त्यांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. या घटनेप्रकरणी तिन लाख रुपयांच्या बिस्किटांसह ट्रक हस्तगत करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

झाकीर अमीन खान (37) रा. जळगाव, शेख बाबू शेख उस्मान (52) रा. पिसादेवी, रिझवान शेख कलीम शेख (25) रा. मिसारवाडी, शेख खलील शेख अब्दुल रहीम (63) रा. कटकट गेट औरंगाबाद आणि आमेर शेख बबलू शेख रा. दावलवाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

औरंगाबद येथील माळीवाडा परिसरात राहणारे राजेंद्र कचरे हे ट्रान्सपोर्ट व्यावसायीक आहेत. गेल्या 3 जुलै रोजी शेख बाबू शेख उस्मान हा त्यांच्याकडे चालक म्हणून कामावर लागला होता. 11 जुलै रोजी मिळालेल्य सुचनेप्रमाणे त्याने नागपूर येथून 6 लाख रुपये किमतीच्य बिस्किटांचा माल ट्रकमधे भरला. बिस्कीटांचा माल त्याला भिवंडी येथे नेवून द्यायचा होता. वाटेत 14 जुलै रोजी चालक शेख बाबू हा सावंगी येथील निलकंठ पेट्रोल पंपावर थांबला. आपल्याकडे पैसे नसल्याचा बहाणा करत ट्रक सावंगी येथे उभा केल्याचे त्याने ट्रक मालक कचरे यांना सांगितले.

ट्रक मालक कचरे यांनी सावंगी येथे जाऊन खात्री केली असता त्याठिकाणी ट्रक नव्हता. याप्रकरणी त्यांनी चिकलठाणा पोलिस स्टेशनाचे पो.नि. देविदास गात यांची भेट घेत तक्रार दाखल केली. ट्रक चोरीला गेल्याचे दर्शवणा-या बाबू या चालकास पोलिस पथकाने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा उलगडला.

साथीदार खलीलसोबत मिळून त्याने ट्रक बिस्किटाच्या मालासह विकण्याचे ठरवले. रिझवान व बबलू या साथीदारांच्या ओळखीने बाबू आणि खलील या दोघांनी तो ट्रक जळगाव येथील भंगार व्यावसायिक झाकीर यास विक्री केला. जळगाव येथील भंगार व्यावसायीक झाकीर याने तो ट्रक जशाच्या तसा चुरा करण्यासाठी यंत्रात टाकतांना त्यात माल असल्याचे त्याला दिसून आले. पाहणी केली असता त्यात बिस्किटे आढळून आली. त्यामुळे त्याने ट्रकमधील बिस्कीटे विकण्यासाठी मास्टर कॉलनीत लपवून ठेवला. बिस्किटांची विक्री करुन ट्रक स्कॅप करण्यापुर्वीच चिकलठाणा पोलिसांचे पथक जळगाव शहरात दाखल झाले. चिकलठाणा पोलिसांनी बिस्कीटांसह तो ट्र्क आणि पाचही आरोपींना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या ट्रकमधे कमी असलेली बिस्किटे आरोपींनी अन्यत्र लपवून ठेवली असावीत असा संशय व्यक्त केला जात आहे. चिकलठाणा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक बालाजी ढंगारे, दीपक देशमुख, सुधाकर बोचरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील आरोपी सध्या औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here