वाहनांवर स्टीकर लावले विवाह सोहळा !!– जालन्यात आयकर खात्याचा धाड सोहळा

जालना : विविध वाहनांनी जालना शहरात दाखल झालेल्या प्राप्तीकर खात्याच्या अधिका-यांनी आपल्या वाहनांवार विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून आगमन केले. विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून दाखल झालेल्या वाहनात बसून आलेल्या प्राप्तीकर खात्याच्या अधिका-यांनी शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या. प्राप्तीकर खात्याने लढवलेल्या या अनोख्या शक्कलची सर्वत्र चर्चा होत आहे.

औद्योगिक परिसरातील काही कंपन्यांसह जालना शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने व घरांवर छापा टाकल्याचे सांगितले जात आहे. 3 ऑगस्ट रोजी जालना शहरात सकाळीच सुमारे शंभर वाहनातून साधारण दोनशे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पथक डेरेदाखल झाले. प्रत्येकाच्या वाहनावर “विवाह सोहळा” असे स्टीकर लावण्यात आले होते. विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून आलेली फौज ही आयकर अधिकारी व कर्मचा-यांची असल्याचे काही वेळाने सर्वांच्या लक्षात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here