सहा लाखाच्या लाचेची मागणी करणा-या अभियंत्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : सहा लाख रुपयांची मागणी करणा-या विज वितरण विभागाच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हेमंत शालिग्राम पाटील रा. जामनेर असे संबंधीत अभियंत्याचे नाव आहे. सदर सापळा औरंगाबाद एसीबी पथकाने राबवला. नेरी येथे सदर अभियंता कार्यरत असल्याचे समजते.

सहा लाख रुपयांची लाच मागणी करणा-या अभियंत्याला एसीबीचा सापळा रचला जात असल्याची कुणकुण लागताच त्याने पळून जाण्याचा मार्ग पत्करला. त्याने सापळा अधिका-यांच्या अंगावर वाहन चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. त्याच्या विरुद्ध एसीबीच्या कलमासह सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम लावण्यात आल्याचे समजते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here