“लंगुर के हाथ मे अंगुर” म्हटल्याने वाढलेल्या वादातून दंग्याचा गुन्हा

जळगाव : पतीसोबत मोटार सायकलवर जाणा-या विवाहीतेकडे बघून “लंगुर के हाथ मे अंगुर” म्हटल्यानंतर वाढत गेलेल्या वादाचे पर्यावसन दंग्यात झाल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला एकुण 36 जणांविरुद्ध दंग्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी तरुण 2 ऑगस्ट रोजी त्याच्या पत्नीला मोटार सायकलने दवाखान्यात घेवून जात होता. त्यावेळी वाटेत संशयीत तरुणाने मोटार सायकलवरील तरुणाच्या पत्नीकडे बघून “लंगुर के हाथमे अंगुर” अशी शेरेबाजी केली. शेरेबाजी करणा-या तरुणाला याबाबत जाब विचारला असता त्याने पत्नीसोबत असलेल्या मोटार सायकलवरील तरुणालाच मारहाण केली. या घटनेप्रकरणी मारहाण झालेल्या तरुणाने नातेवाईकांना सोबत घेत पोलिस स्टेशनला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेत जमलेल्या जमावाने लाठ्या – काठ्यां, दगड विटांनी झालेल्या मारहाणीत आठ जण जखमी झाले होते. या घटने प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला एकुण 36 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक राजेंद्र साळुंखे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here