डॉक्टर तरुणीचे बनावट व्हाटसअ‍ॅप चॅटींग पाठवले भावी पतीला

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : डॉक्टर तरुणीचे बनावट व्हाटसअ‍ॅप चॅटींग तयार करुन त्याचा स्क्रीनशॉट तिच्या भावी डॉक्टर पतीला पाठवल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी तरुणी पाचोरा तालुक्यातील रहिवासी असून तिचा विवाह डॉक्टर तरुणासोबत ठरला आहे. अज्ञात इसमाने आपली ओळख लपवून तिचा फोटो व ती वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे व्हाटसअ‍ॅप बनावट चॅटींग तयार केले. त्या बनावट चॅटींगचे स्क्रीनशॉट डॉक्टर तरुणीच्या भावी डॉक्टर पतीच्या इन्स्टाग्राम खात्यावर पाठवून तिची बदनामी केली. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशनला भा.द.वि. 501 सह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here