अकोला पोलिसांवर अमरावतीत गोळीबार

अमरावती : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या अकोला पोलिसांच्या पथकावर अमरावती शहरात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत लक्ष्य करण्यात आलेले पोलिस बचावले आहेत. राजेश रावत या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी अकोला पोलिसांचे पथक अमरावती शहरातील गाडगे नगर पोलिस स्टेशन हद्दीत दाखल झाले होते.

आपल्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक आल्याचे समजताच राजेश रावत याने पोलीस पथकावर गोळीबार केला. पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्याचे समजते. मात्र या घटनेत कुणीही जखमी झाला नाही. स्वातंत्र्य दिनी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडून बचावासाठी वेगात वाहन चालवून पलायन करणा-या आरोपीचे वाहन एका खांबावर धडकले. त्याच क्षणी पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here