महापौरांच्या घरासमोर दगडफेक प्रकरणी सहा न्यायालयीन कोठडीत

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणूकीच्या वेळी जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोर दगडफेक व घरावर गुलालाची उधळण तसेच फटाके फोडल्याप्रकरणी नंतर अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी दोघांना एक दिवस पोलिस कोठडी तर इतर सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

योगेश राजेंद्र नाईक व तेजस ज्ञानेश्वर वाघ दोघे रा. साईबाबा मंदीराजवळ मेहरुण जळगाव अशी एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. अजय संतोष सांगळे, किरण उर्फ उली जगदीश नाईक, तेजस उर्फ लगड्या सुनिल घुगे, दिपक रविंद्र नाईक, महेश उर्फ माही लक्ष्मण लाड आणि रामेश्वर वासुदेव सानप अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. घरात वयोवृद्ध रुग्ण असून गणेश विसर्जन मिरवणूक पुढे न्यावी असे सांगितल्याचा राग आल्याने तरुणांनी महापौरांच्या घरावर गुलाल उधळण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रसंगी महिला महापौर जयश्री महाजन यांनी पोलिस प्रशासनावर प्रासंगिक संंताप व्यक्त केला होता. मात्र परिस्थिती आटोक्यात आणण्यासह संशयीतांना अटक करण्याचे काम पोलिसांनी चोखपणे बजावले हेदेखील नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here