26 लाखाच्या अफरातफरीबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : विकास कामासाठी मंजुर रक्कम काढून, बनावट दस्तावेज तयार करुन ते खरे असल्याचे चौकशीत दाखवून 26 लाख 36 हजार 300 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर गुन्हा दाखल होण्यास गती आली.

जळगाव तालुक्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक बबन राजु वाघ आणि सरपंच उखा किसन मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध भा.द.वि. 420, 467, 468, 471, 406, 409, 120(4). 34 नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पद्माकर बुधा अहिरे पंचायत समिती जळगाव येथील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वेळोवेळी झालेली चौकशी, त्यांचे अहवाल, ग्रामस्थांच्या तक्रारी, सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा पाठपुरावा आदींच्या माध्यमातून हा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here