घरगुती गॅसचा रिक्षासाठी वापर – 3 सिलेंडर, 2 रिक्षासह तिघे ताब्यात

जळगाव : घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस ऑटो रिक्षात इंधनाच्या रुपात भरतांना टाकलेल्या छाप्यात जळगाव शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गॅस भरण्याचा पंप, दोन रिक्षा, तिन सिलेंडर व गॅस भरण्याचे साहित्य असा सुमारे 3 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील बळीराम पेठ भागातील गंगूबाई शाळा परिसरात रात्री 8 वाजून 10 मिनीटांनी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रिक्षात अवैध गॅस भरणा-यांमधे खळबळ माजली आहे. फिरोज खान सलीम खान रा. नॅशनल जिमच्या बाजूला काटया फाईल जळगांव, पडित शिवराम शिरसाळे, शिवाजीनगर जळगाव आणि शेख खालीद शेख शफी रा. गणेश पूरी मेहरुण जळगांव असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्यासह सपोनि संदिप परदेशी यांच्यासह पोलिस नाईक राजकुमार चव्हाण, पोकॉ तेजस मराठे, योगेश ईधांटे, अमोल ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. याप्रकरणी पो.कॉ. तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा अत्यावश्यक वस्तु कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here