शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास दोन्ही गटांना नाकारली परवानगी

मुंबई : शिवसेनेचा यावेळी होणारा दसरा मेळावा आणि त्यासाठी लागणारी परवानगी हे दोन्ही विषय गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत आले आहेत. मुंबई महापालिकेने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेत मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना शिवाजी पार्कसाठी परवानगी नाकारल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिकेने जारी केलेल्या पत्रातून तसे दिसून येत आहे.

“आम्ही पुन्हा एकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करु. संपूर्ण शिवसेना आमच्यासोबत असून सर्वाधिक आमदार, खासदार, पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना कोणती हा प्रश्नच उद्भवत नसल्याचे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here