बुलाती है मगर जाने का नहीं फेम शायर राहत इंदौरी यांचे निधन

राहत इंदौरी यांचे निधन

इंदोर : बॉलीवुड मधे अनेक गाणी लिहिणारे सुप्रसिद्ध शायर तथा उर्दु साहित्याचे अभ्यासक राहत इंदौरी यांचे आज ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना कोरोनाचे देखील संक्रमण झाले होते. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ऑरबिंदो रुग्णाल्यात भरती करण्यात आले होते.

मृत्यूपुर्वी आज सकाळी राहत इंदौरी यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की आपणास कोविड १९ ची लक्षणे दिसून आल्याने आपण कोरोना चाकणी केली होती. तो अहवाल पॉझीटीव्ह आला. याबाबत मी रुग्णालयात दाखल असून माझ्यासाठी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा. मला अथवा माझ्या परिवारातील सदस्यांना फोन करु नका. माझ्या प्रकृतीबद्दल आपणास ट्विटर अथवा फेसबुकवर माहिती देण्यात येईल.

दरम्यान आज दुपारी सायंकाळी त्यांना वयाच्या सत्तराव्या वर्षी रुग्णालयात उपचार घेत असतांना अचानक ह्दयविकाराचा तिव्र झटका आला. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. टिकटॉकसारख्या माध्यमातून वो बुलाती है मगर जाने का नही या त्यांच्या शायरीने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. राहत इंदौरी महाविद्यालयीन काळात फुटबॉल व हॉकी टीमचे कॅप्टन देखील होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here