चार्जरच्या वायरने गळा आवळून पतीने केली पत्नीची हत्या

जळगाव : मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना आज जळगाव शहराच्या आहुजा नगर परिसरात उघडकीस आली आहे. आज शनिवार 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

कविता जितेंद्र पाटील (20) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेनंतर मयत कविताचा संशयीत मारेकरी पती जितेंद्र पाटील हा स्वत:हून तालुका पोलिस स्टेशनला हजर झाला. आपण पत्नी कविताची हत्या केल्याचे त्याने कबुल केले आहे.

मयत कविता आणि जितेंद्र यांचा सुमारे दोन वर्षापुर्वी प्रेमविवाह झाला होता असे समजते. कविताचे अन्य एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते असा जितेंद्रचा आरोप आहे. या आरोपामुळेच त्याने चिडून जावून त्याने तिची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळासह सामान्य रुग्णालयात अप्पर पोलिस अधिक्षकांसह तालुका पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचा-यांनी धाव घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here