गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

जळगाव – महात्मा गांधी यांच्या जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ म्हणून  जगभर साजरा करण्यात येतो. या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने सालाबादाप्रमाणे ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा गांधीजींची१५४ वी जयंती व लाल बहादूर शास्त्रीजींची ११९ वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून सरदार वल्लभभाई पटेल टॉवर  म.न.पा. मार्गे पंडीत जवाहरलाल  नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गाने महात्मा गांधी उद्यानात यात्रा पोहचेल. त्यानंतर महात्मा गांधी उद्यानात विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजीत विशेष कार्यक्रमामध्ये  मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी प्रमुख वक्ते म्हणून संबोधन करतील तर अध्यक्ष म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार असतील ते यावेळी उपस्थितीतांना अहिंसेची  शपथ देतील. शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून  आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ‘अहिंसा सद्भावना यात्रेत’ सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.

महात्मा गांधीजींची ती सायकल गांधीतीर्थमध्ये आजपासून पाहता येईल – भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर तालुक्यातील जोगिया येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांना खुद्द महात्मा गांधीजींनी एक सायकल भेट दिली होती. स्वातंत्र्य सेनानी प्रभुदयालजी यांच्या पत्नी तथा माजी आमदार श्रीमती कमला साहनी आणि त्यांची मुलगी अमिया रूंगठा यांनी ही सायकल महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्या सांगण्यावरून गांधी रिसर्च फाऊंडेशनला दिलीआहे. महात्मा गांधीजींच्या परिस स्पर्शाने पावन झालेली ही सायकल ‘गांधी तीर्थ’मध्ये संग्रहालयात ठेवण्यात आली आहे,राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जाज्वल्य आठवण व संदर्भ म्हणून जळगाव येथील ‘गांधी तीर्थ’ बघणाऱ्या अभ्यागतांसाठीती उद्या 2 ऑक्टोबर 2022, महात्मा गांधीजींच्या जयंती पासून पाहण्यासाठी खुली करण्यात येत आहे.

***

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here