शिरपूर तालुक्यातील अनेर येथे स्फोटक जिलेटीन जप्त

नाशिक परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकासह थाळनेर पोलिस स्टेशन आणि बॉंब शोध पथक धुळे यांच्या मदतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत शिरपूर तालुक्यातील अनेर येथे जिलेटिन कांड्या, इलेक्ट्रिक डेटोनेटर वायर आदी 8 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल आरोपींसह जप्त करण्यात आला आहे.

किशन गोरख भामरे रा.अनेर ता.शिरपुर जि.धुळे आणि स्फोटके देणारा योगेश नामक तरुण यांच्याविरुद्ध थाळनेर पोलिस स्टेशनला स्फोटक अधिनियम 1908 चे कलम 5, 6, तसेच भा.द.वि 286, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.नि.बापू रोहम, स.पो.नि. सचिन जाधव, स.पो.नि. उमेश बोरसे, सहायक फौजदार फुलपगारे, फुलपगारे, बॉंब शोध पथक धुळे, सहायक फौजदार बशीर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, शकील शेख, पोलिस नाईक मनोज दुसाने, प्रमोद मंडलीक, सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास थाळनेर पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here