तायक्वांदो राज्य संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

जळगाव : ‘मि सुद्धा खेळाडु असुन तायक्वांदो संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. तायक्वांदो खेळातील जो गैर प्रकार निदर्शनास येत आहे तो लवकरच शासकीय स्तरावर संपवू आणि खेळाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून पुढचे पाऊले उचलु’ असा विश्वास तायक्वांदो राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दुसर्‍या राजस्तरिय पंच परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी दिला.

जळगाव येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ची दुसरी राजस्तर पंच परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेसाठी राज्यातून २८ जिल्ह्यातील ३९७ पंचांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. गिरीश महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन समुहाचे संचालक श्री अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलींद दिक्षीत, तायक्वांदो फेडेरेशन चे उपाध्यक्ष श्री विनायक गायकवाड, ताम चे महासचिव मिलींद पठारे, शिव छञपती पुरस्कर्ते प्रविण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, दुलीचंद मेश्राम, व्यंकटेश कर्रा, अजित घारगे यांची उपस्थित होते. 

ना. गिरीष महाजन पुढे बोलताना म्हणाले कि मि लहानपणापासून खेळाडु आहे. आजही मि मैदानावर घाम गाळतो. माझ्याकडे क्रीडा खाते आल्यावर पहिली बैठक घेतली आणि विचारणा केली त्यात खेळाडुंची खुप प्रश्न मागे पडले होते त्यावर तात्काळ अंमलबजावणी करत २०० रुपयाचा भत्ता ४८०रु केला एन सी सी चा १० रुपयाचा भत्ता १०० केला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे विजेत्या खेळाडुंना २० लक्ष पासून ५० लक्षापर्यंतची बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. असे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे ते सांगत होते. पंचांनी खेळाडुवर कोणताही अन्याय न होऊ देता निष्पक्षपाती काम करावे आणि देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु पुरवावे असेही यावेळी त्यांनी नमुद केले आहे. 

या सेमिनार चे आयोजन जळगाव तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री अजित घारगे यांच्या प्रयत्नातून झाले असुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश घारगे, जयेश बावीस्कर ललित पाटील, रविंद्र धर्माधिकारी, अरविंद देशपांडे, सौरभ चौबे, ॠशीकेश खारोळे, आकाश बाविस्कर, निकेतन खोडके, विष्णु झालटे, सारिपुत्त घेटे, तृप्ती तायडे, प्रिती घोडेस्वार, विशाल बेलदार, सिद्धांत पाटील, पुष्पक महाजन, जयेश कासार, श्रेयांक खेकारे, जिवन महाजन यांनी प्रयत्न केले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री दुलिचंद मेश्राम यांनी सुत्रसंचलन श्री नेताजी जाधव यांनी केले तर आभार व्यंकटेश कर्रा यांनी केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here