गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने आज संगीत विषयावर व्याख्यान व कार्यशाळा

जळगाव : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” अंतर्गत संगीत विषयावर रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ११ ते १२.३० या वेळात पुणे येथील दक्षिणा द्वारका फाऊंडेशनच्या संचालिका सुश्रूती संथानम यांचे “संगीत , सभ्यता व भारतीय समाज” विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भोजनोत्तर सत्रात मंदार कारंजकर यांचे “शरीर, मन व विचारांवर होणारा संगीताचा प्रभाव” तर दाक्षायणी आठल्ये “हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सौंदर्यापूरक मूल्यांची समीक्षा” या विषयावर प्रस्तुती करणार आहेत. सर्व मित्रांना उपस्थिती देणाऱ्या संगीत साधकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा व त्यासाठी गिरीश कुलकर्णी (नंबर ९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक संस्थांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here