बॉलिवूड कलाकार कधी स्वत: निवडणूकीच्या रिंगणात उतरतात तर कधी उमेदवाराच्या प्रचारासाठी पुढे येतात. अभिनेत्री कंगना रनौत हिने काही दिवसांपूर्वी म्हटले आहे की तिला हिमाचल प्रदेशातून लोकसभेसाठी तिकीट दिले तर ती निवडणूक लढण्यास तयार आहे. कंगनानंतर आता मनीषा कोईराला देखील राजकरणात सक्रीय होतांना दिसून येणार आहे. मात्र ती भारताच्या नव्हे तर नेपाळच्या राजकारणात सहभाग घेणार आहे.
मनीषाने आपल्या ट्वीटर अकाउंवरुन ही माहिती दिली आहे. तीने म्हटले आहे की मी माझ्या कामातून वेळ काढून राष्ट्रीय प्रजातन्त्र पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी घरी जात आहे. पक्षाचे तरुण आणि दूरदृष्टी असलेले नेते राजेंद्र लिंगदेन यांचा प्रचार करणार आहे. नेपाळमध्ये 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संसदीय आणि प्रांतीय पातळीवरील निवडणुका होत आहेत.
मनिषा कोईराला मुळ नेपाळची असून नेपाळचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान बिश्वेश्वर प्रसाद कोईराला यांची ती नात आहे. मनीषाने नव्व्दच्या दशकात बॉलीवुडमधे पदार्पण केले होते. ‘बॉम्बे’, ‘दिल से’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. मनीषाने कॅन्सरसारख्या रोगावर मात करून पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे.