बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मध्यंतरी दोघेही विवाह बंधनात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता मलायका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मलायका गरोदर असून अर्जुनच्या बाळाची आई होणार असल्याचे म्हटले जात आहे. मलायका व अर्जुन ऑक्टोबर महिन्यात लंडनच्या ट्रिपला गेले होते. तेव्हाच त्यांनी ही गुड न्यूज त्यांच्या नातेवाईकांना दिली असल्याचे म्हटले जात आहे.
अर्जुन कपूर किंवा मलायका अरोरा या दोघांपैकी कुणीही याबद्दल वक्तव्य केलेलं नाही. मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानसोबत लग्नगाठ बांधली होती. सन 2017 दोघांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. मलायका ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे. हा शो मलायकाच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यावर आधारित असणार आहे. या शोमध्ये अर्जुन कपूर व अरबाज खानही झळकणार आहेत.