फोटोग्राफरसोबत लिव्ह इनमधे राहणारी तरुण विवाहिता बेपत्ता

जळगाव : 26 वर्ष वयाच्या फोटोग्राफरसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहणारी 22 वर्ष वयाची विवाहीता बेपत्ता झाली आहे. फोटोग्राफर तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणारा तरुण फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. त्याचे शास्त्री नगर भागातील तरुण गृहिणी असलेल्या विवाहितेसोबत प्रेम जडले. दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहू लागले. दरम्यान 29 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील एका स्टॅंप वेंडरच्या कार्यालयात ती आली व तेथून बेपत्ता झाली.

पाच फुट उंची असलेल्या या विवाहितेचा रंग गोरा असून ती शरीराने सडपातळ आहे. बेपत्ता झाली त्यावेळी तिने गुलाबी रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅंट घातली होती. तरुण विवाहीता बेपत्ता झाल्याने शास्त्री नगर परिसरात खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here