दफनविधीची लाखोची रक्कम संशयाच्या भोव-यात – फारुख शेख यांच्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : कोविड कालावधीत मरण पावलेल्या 111 मुस्लिम बांधवांच्या दफनविधीचा खर्च त्यांच्या नातेवाईकांनी स्वत: केला असतांना तो खर्च जळगाव महानगरपालिकेकडून घेण्यात आल्याचा आरोप जळगावचे फारुख शेख यांच्यावर करण्यात आला आहे. शेख फारुख शेख अब्दुल्ला हे जळगावच्या मुस्लीम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे सचिव आहेत. याप्रकरणी शेख मुश्ताक अहमद मोहम्मद इकबाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस  स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोविड कालावधीत मरण पावलेल्या 111 मुस्लिम बांधवांच्या दफनविधीसाठी प्रत्येकी 1750 रुपये याप्रमाणे 1लाख 94 हजार 250 रुपयांचे हे प्रकरण उघड झाले आहे.   

मुस्लीम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्ट जळगांव या संस्थेचे कार्यालय जळगावच्या अजिंठा रस्त्यावर आहे. याठिकाणी मुस्लिम समुदायाच्या दफनविधीसह नमाजाची व्यवस्था केली जाते. मुस्लिम समाजाच्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून नाममात्र शंभर रुपये फी घेवून रजिस्ट्रेशन केले जाते. मयत व्यक्तीच्या दफनविधीचा खर्च नातेवाईक स्वत: करतात.

11 सप्टेबर रोजी या ट्रस्टची सर्वसाधारण सभा झाली होती. या ट्रस्टचे सदस्य शेख मुश्ताक अहमद मोहम्मद इकबाल यांनी सन 2020 – 2021 आणी 2021 – 2022 या कालावधीतील जमा खर्चाचा सखोल अभ्यास केला असता हा प्रकार उघडकीस आला आहे. कोविड कालावधीत दफनविधीबाबत कोणताही खर्च झाला नसतांना जळगाव महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करुन 111 मृतकांच्या दफनविधीच्या खर्चाची मागणी करण्यात आली होती.

दि.10/11/2020, 19/04/2021, 21/08/2021 आणि 25/11/2021 या तारखांना पत्रव्यवहारातून केलेल्या मागणीप्रमाणे जळगाव महानगरपालिकेने 111 मृतकांच्या दफनविधीच्या 1 लाख 94 हजार 250 रुपयांच्या मागणीला मंजुरी देण्यात आली. या रकमेतून कर वजा जाता 1 लाख 86 हजार 480 रुपये ट्रस्टच्या बॅंक ऑफ इंडीयाच्या खात्यावर 8 ऑगस्ट 2022 रोजी जमा झाले आहेत. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु असून खळबळ उडाली आहे. याबाबत फारुख शेख यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here