अनुभूती स्कूल ‘इंडियाज् टॉप 10 बोर्डिंग स्कूल’ श्रेणीत’-एज्युकेशन टुडेच्या सर्वेक्षणात भारतात आठवी तर महाराष्ट्रात प्रथम

जळगाव दि.12 (प्रतिनिधी) – शैक्षणिक क्षेत्रातील भारतामधली नावाजलेली संस्था ‘एज्युकेशन टुडे’ यांनी ‘भारतातील टॉप 10 बोर्डिंग स्कूल’ सर्वेक्षणात अनुभूती स्कूलला भारतातील 8 आणि महाराष्ट्रील पहिल्या क्रमांकाची स्कूल असल्याची श्रेणी मिळाली. हॉटेल ताज बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या समारंभात स्कूलचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविले गेले. या आधी काही दिवसांपूर्वी अनुभूती स्कूलचा ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड्स 2022-23’ ने महाराष्ट्रात प्रथम सन्मान झालेला आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारलेली अनुभूती स्कूल इयत्ता 5 वी ते 12 पर्यंत पूर्ण निवासी आहे. अनुभूती मध्ये औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रुजविणे जातात. ‘इथे शिकणारा विद्यार्थी नोकरी मागणाऱ्यापेक्षा तो नोकरी देणारा ठरावा’ या विचारांनी या शाळेची वाटचाल सुरू आहे. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनुभूती स्कूल कडे पाहिले जाते. शाळेच्या व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे परिपूर्ण लक्ष असते.

76,738 शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण, प्रत्यक्ष परिस्थिती आणि नामांकन या तीन पद्धतीने सर्व स्कूलची श्रेणी तपासून पाहिली गेली. या सर्वेक्षणात प्रामुख्याने शैक्षणिक प्रतिष्ठान, शिक्षकांचे शिक्षण, अनुभव, गुणवत्ता, डिजिटल लर्निंग, क्रीडा शिक्षण, पालकांचा सहभाग, फ्युचर प्रुफ लर्निंग, शाळेची सेवा साधने, पैशाचे मूल्य, कम्युनिटी सर्व्हिस, विद्यार्थ्याचे मनोवैज्ञानिक कल्याण, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तीक लक्ष तसेच स्कूलची वेगळी काही वैशिष्ट्ये इत्यादी निकष लावलेली होती. या सर्वात अनुभूती स्कूल अव्वल ठरलेली आहे.

‘संस्कार आणि संवेदनशील मन निर्माण करणे हे आपल्या शिक्षणाचे उद्दिष्ट असावे’ असे मानणारे श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित, शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक संवेदना जपणाऱ्या अनुभूती स्कूलने भारतातील निवासी शाळा क्रमवारीत भारतातील आठवी आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे ही मोठी गौरवाची गोष्ट आहे. फक्त भौतिक गोष्टी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट ठेवलेल्या आमच्या स्कूलने निस्पृहपणे शैक्षणिक यज्ञ चालविलेला आहे. श्रद्धेय भाऊंच्या मार्गदर्शनानुसार स्कूलची प्रगतीकडे वाटचाल सुरूच असेल’.श्री. अतुल जैन, चेअरमन, अनुभूती स्कूल


‘शिक्षणामुळे आपल्या पिढीबरोबरच येणाऱ्या अऩेक पिढ्यानपिढ्या सुसंस्कृत होतील.’ असे या स्कूलचे संस्थापक श्रद्धेय मोठे भाऊंचे विचार होते. आज विविध क्षेत्रात नाव उज्ज्वल करत आहेत ह्या पेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही. जळगाव येथील स्कूल महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविते, स्कूलला मिळालेला सन्मान हा जळगावसह महाराष्ट्रासाठी मोठा अभिमानास्पद आहे. शाळेच्या नावलौकीत या सन्मानामुळे भर पडलेली आहे. हा लौकिक टिकविण्यासाठी स्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर सहकाऱ्यांसह विद्यार्थी व पालकांचे विशेष सौजन्य आहे हे मात्र तितकेच खऱे आहे.’ सौ, निशा जैन, संचालक, अनुभूती स्कूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here