अनुभूतीतून मिळतेय परिस्थितीचे भान निर्माण करून देणारे शिक्षण – ‘फाउंडर्स डे’च्या उद्घाटनावेळी साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडेंचे विचार

जळगाव : सामान्य घटकातील विद्याथ्र्यांना परिस्थितीचे भान निर्माण करून देणारे शिक्षण अनुभूती मधून दिले जाते, भवरलाल जैन यांची हिच इच्छा होती. विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत यशस्वी व्हायला हवा याच विचाराने अनुभूती स्कूलची निर्मिती करण्यात आली असल्याचे साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी अनुभूती स्कूलच्या ‘फाउंडर्स ‘डे’च्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.

‘फाउंडर्स डे’ निमित्ताने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात विद्यार्थ्यांचा तीन तास विविध सांस्कृतिक गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात सरस्वती वंदना, स्वागत गीत, गणेश वंदना, पसायदान, विविध प्रकारचे नाट्य, हिंदी कविसंमेलन असे विविध कार्यक्रमांचा घेण्यात आले. या वेळी संघपती दलिचंद जैन, कविवर्य ना. धो. महानोर, डॉ. सुभाष चौधरी, अशोक जैन, अतुल जैन, निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, नितीन लढ्ढा, अनिश शहा, फरहाद गिमी व ज्योती जैन, डॉ. भावना जैन उपस्थित होते. वंदना मारकड यांनी सूत्रसंचालन केले. राणी चौबे यांनी आभार मानले. या वेळी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव – अनुभूती इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या तीन क्रमांकांचा, विविध विषयांत पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यात प्रणव राऊत, चंचल पवार, रोशन पवार, ओजस्वी बोरसे, श्रुती खैरनार, शर्वरी वाडकर, कल्पना जोशी, पूर्वां राजपूत, वैष्णवी पवार, निकिता सोनवणे, विजया बारी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्याथ्र्यांतर्फे चंचल पवार हिने मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ‘वंदे भारत’ अंतर्गत कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here