रेशनच्या धान्याच्या अपहार – उप विभागीय अधिका-यासह चौघा तहसिलदारांविरुद्ध गुन्हा

जळगाव : संगनमताने 7 लाख 27 हजार 244 रुपये किमतीच्या गहू, साखर व तांदूळ या रेशनच्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी भुसावळ महसुलच्या तत्कालीन उप विभागीय अधिका-यांसह चौघा तत्कालीन तहसीलदारांसह गोदाम व्यवस्थापक अशा  एकुण सहा  जणांविरुद्ध भुसावळ शहर  पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरासह महसुल विभागात खळबळ माजली आहे.

तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे, भाऊसाहेब थोरात, बोदवडचे तत्कालीन तहसीलदर रविंद्र जोगी, एस. यु. तावडे यांच्यासह तत्कालीन उप विभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर आणि तत्कालीन गोदाम व्यवस्थापक आर. एल. राठोड अशी  गुन्हा दाखल झालेल्या सहा  जणांची नावे आहेत.

अ‍ॅड. आशीष प्रमोद गिरी (मुंबई) हे याप्रकरणी फिर्यादी आहेत. न्यायालयाकडून चौकशीसाठी पोलिस स्टेशनला आलेल्या कागदपत्रानुसार विविध कलमानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय कंखरे करत आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here