ताट वाजवू नका सांगण्यास गेला आणि जीव गमावून बसला

जळगाव : घरासमोर जोरजोरात ताट वाजवून थर्टी फर्स्टचा जल्लोष करणा-या तरुणाला ताट वाजवू नका असे सांगण्यास गेलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा जणांना अटक करण्यात आली आहे. अरुण कालू भिल (तांडे पोस्ट अहिल्यापूर ता. शिरपूर जिल्हा धुळे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

धरणगाव येथील जळगाव रस्त्यावर असलेल्या क्रिष्णा कॉटन जिनींग येथील कामगार अरुण भिल याच्या घरासमोर 31 डिसेंबरच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास तरुणांचे टोळके जोरजोरात ताट वाजवत होते. त्यावेळी अरुण भिल व इतरांनी त्यांना ताट वाजवू नका, आम्हाला झोपायचे आहे असे म्हटले. त्याच्या बोलण्याचा राग आल्यामुळे संतोष महेशराव मंडल याने अरुण भिल यास डोक्यावर हातातील लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत अरुण भिल मरण पावला.

राजेंद्र मंडल याने विकास पवार याच्या डोक्यावर मारहाण करुन दुखापत केली. मारहाण, शिवीगाळ करणा-या संतोष मंडल, राजेंद्र मंडल यांच्यासह एकुण तेरा जणांविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखाराम तुकाराम पवार (भिल) याने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करत आहेत. यातील दहा जणांना अटक करण्यात आली आहे.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here