दिवंगत पोलीस अंमलदारांच्या पाल्यांना नियुक्तीपत्र

जळगाव : शासकीय सेवेत असताना दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अनेक वर्ष प्रतीक्षेत राहावे लागते. मात्र अलीकडे शासनाने अनुकंपा भरतीची मर्यादा वाढवली आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलीस दलातील दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना जलद गतीने अनुकंपा उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवत नियुक्तीपत्र दिली आहेत.

सोळा उमेदवारांना 2 जानेवारी 2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पोलिस अधिक्षकांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ व नववर्षाची ही एकप्रकारे पोलिस पाल्यांना ही भेट मिळाल्याचे म्हटले जात आहे.

यावेळी उपस्थित नवनियुक्त उमेदवारांना पोलीस दलातील कर्तव्याबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक संदीप गावित, कुणाल सोनावणे, कार्यालय अधीक्षक प्रवीण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, रावेर  पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here