पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव पोलिसांचे पथ संचलन

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला 2  जानेवारी 1961 साली ध्वज प्रदान केला. तोच दिवस महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्त 3 जानेवारी 2023 रोजी जळगाव पोलीस दलातर्फे जळगाव शहरात पोलिसांचे पथ संचलन करण्यात आले.

या वेळी नागरिकांना पोलीस दलातील वेगवेगळ्या पथकांचे दंगा व काबू पथक, क्विक रिस्पॉंस टीम, वाहतूक पोलीस, पोलीस बँड, पोलीस पथक अशा पथकांनी पोलीस बँड संगीतावर ऐटीत पथ संचलन केले. पोलीस बँड पथकाचे चौका चौकात  संगीतमय सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस दलाचे स्वागत आणि कौतुक केले.

पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, रंगनाथ धारबळे, लीलाधर कानडे, विजयकुमार ठाकूरवाड, दिलीप भागवत, जयपाल हिरे, राखीव पोलीस निरीक्षक सोनवणे तसेच इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अमित माळी यांनी केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here